रायगड/रोहा : शशिकांत मोरे
रोहा-नागोठणे रस्त्यावर भिसे खिंडीत कोळशाची ओव्हरलोड वाहतुक करणाऱ्या डंपर चालकाकडून ओव्हरटेक करीत असताना सोबतच्या दोन वाहनांना धकडले.या जोरदार झालेल्या धडकेत अपे टेम्पो आणि दुचाकीचा अक्षरशः चुराळा झाला आहे.या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नाही मात्र डंपर चालकाने या ठिकाणाहून धूम ठोकली आणि फरार झाला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,धाटाव एमआयडीसीतील कंपनीत क्षमतेपेक्षा अधिक कोळसा वाहतूक करणाऱ्या डंपर क्रमांक एम एच ४६ बी एक्स १४६१ नागोठणे बाजुकडून येत असताना समोरून येणाऱ्या वाहनांचा विचार न करता चुकीच्या बाजूने भरधाव वेगाने जाणाऱ्या या डंपर चालकाने एम.एच ०६ बी जी ३०१५ एपे कंपनीचा पिवळ्या रंगाचा रिक्षा टेम्पो व एम एच ४७ बी ए ७६४९ क्रमांकाची काळया रंगाची दुचाकी यांना धडकले.या धडकेत मात्र दोन्ही वाहनांचा अक्षरशः. चुराडा झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.दरम्यान अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नाही मात्र डंपर चालकाने या ठिकाणाहून धूम ठोकली आणि फरार झाला आहे.या घटनेचे वृत्त समजताच रोहा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
वाहतूकीचे सर्व नियम धाब्यावर बसवून नागोठणे -भिसे खिंडीतून कोळश्याची राजरोसपणे वाहतूक होत आहे.या डोंगर भागात खिंडीत नागमोडी वळणे असल्याने या ठिकाणी सातत्याने अपघात हे ठरलेलेच आहेत.मात्र दररोज रहदारी करणाऱ्या प्रवासी वर्गाला याचा प्रचंड त्रास होत आहे.ओव्हरलोड वाहतुकीच्या नियमाना धाब्यावर बसवून राजरोसपणें खुले आम वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कुठलीच कारवाई पोलीस प्रशासनाकडून होत नसल्याने या ठिकाणी अनेकांनी नाराजी व्यक्त केली.तर समोर घडलेल्या या अपघाताचे गांभीर्य लक्षात घेऊन महिला वर्गानेही चिंता व्यक्त केली.





