देवगड : सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश उदय रमेश लळीत यांनी प्रथमच आपल्या विजयदुर्ग गिर्ये येथील कुलदेवतेचे रविवारी परिवारासहित दर्शन घेतले. गिर्ये येथील असलेले श्री लक्ष्मी नृसिंह मंदिर हे त्यांचे कुलदैवत आहे. गिर्ये येथील मंदिरात त्यांनी दर्शन घेऊन सर्व लळित परिवाराबरोबर यावेळी संवाद साधला. यावेळी लळीत परिवारातर्फे त्यांचा सपत्नीक शाल व श्रीफळ व ओटी भरून सत्कार करण्यात आला. याआधी झालेल्या लळीत कुटुंबाच्या स्नेहसंमेलन कार्यक्रमा वेळी त्यांच्या परिवारातील साहित्यिका सविता लळीत यांनी उपस्थिती दर्शवली होती. या प्रवासादरम्यान त्यांनी देवगड एज्युकेशन बोर्ड मुंबई संचलित श्री. अ. कृ. केळकर हायस्कूल वाडा या शाळेला देखील सदिच्छा भेट दिली.
Home महाराष्ट्र देवगड सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश उदय लळीत यांनी कुलदेवतेचे परिवारासहित घेतले दर्शन.!





