देवगड : सिंधुदुर्ग जिल्हा भाजपाचे माजी उपाध्यक्ष बाळ खडपे यांचे वडील वसंत खडपे यांचे नुकतेच निधन झाले. देवगड येथे बाळ खडपे व परिवाराची भेट घेऊन केंद्रीय मंत्री व भाजप नेते नारायण राणे यांनी त्यांचे सांत्वन केले यावेळी सोबत नीलम ताई राणे होत्या. यावेळी माजी आमदार अजित गोगटे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, तालुका अध्यक्ष डॉ. अमोल तेली, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश बोडस, देवगड जामसंडे भाजपाचे शहराध्यक्ष योगेश पाटकर, भाजपा पदाधिकारी वैभव कळंगुटकर, अरीफ बगदादी देवगड जामसंडे नगरपंचायतीचे भाजपाचे गटनेते शरद ठुकरुल, माजी सभापती रवी पाळेकर,नगरसेविका प्रणाली माने, माजी नगराध्यक्ष प्रियांका साळस्कर, भाजपा महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष उषःकला केळुसकर, माजी नगरसेवक बाळा गावकर, श्याम तेली, कुणकेश्वरचे माजी सरपंच गोविंद घाडी इत्यादी मान्यवर इत्यादी उपस्थित होते.





