श्री स्वामी प्रतीक्षा भक्ती सेवा मंडळ पळसेवाडी बिबवणे, श्री गजानन महाराज ध्यान मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन.!

22

कुडाळ : तालुक्यातील श्री स्वामी प्रतीक्षा भक्ती सेवा मंडळ, पळसेवाडी बिबवणे येथील श्री गजानन महाराज ध्यान मंदिरतर्फे गुरुवार दिनांक ३० नोव्हेंबरपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक ३० नोव्हेंबर गुरुवार रोजी दुपारी एक वाजता आरती, महाप्रसाद, दुपारी दोन वाजता श्री स्वामी प्रतीक्षा भक्ती मंडळ आयोजित प्रबोधनात व्याख्यान ‘शाश्वत सुखी जीवनासाठी अध्यात्म.!’ व्याख्याते ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक रुपेश पाटील यांचे व्याख्यान होणार असून सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी श्रींची पालखी, सायंकाळी सात ते नऊ श्री दत्तकृपा भजन मंडळ नांदोस यांचे सुश्राव्य भजन, रात्री नऊ वाजता आरती व महाप्रसाद.

तसेच शुक्रवार दिनांक १ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी साडेआठ वाजता श्री गणेश याग, दुपारी एक वाजता आरती व महाप्रसाद, दुपारी तीन वाजता श्री स्वामी समर्थ भजन मंडळ घारपी यांचा भजनाचा कार्यक्रम, तसेच सायंकाळी ठीक सात वाजता नाईक मोचेमाडकर पारंपारिक दशावतार लोकनाट्य मंडळ मोचेमाड तालुका वेंगुर्ला यांचा दणदणीत नाट्य प्रयोग ‘पुत्र व्हावा ऐसा, ज्याचा तिन्ही लोकी डंका.!’ सादर होईल.  तरी सदर कार्यक्रमांच्या आस्वाद घ्यावा व श्री स्वामी चरणी लीन व्हावे,असे आवाहन श्री स्वामी प्रतीक्षा भक्ती सेवा मंडळ पळसेवाडी, बिबवणे व श्री गजानन महाराज ध्यान मंदिर यांच्या आयोजन मंडळातर्फे करण्यात आले आहे.