कुडाळ : आजचं युग हे अत्यंत धावपळीचे आणि अल्प सुखासाठी धावणारे आहे.मात्र आजच्या आधुनिक तंत्रज्ञान युगात खरी गरज आहे ती योग्य मार्गदर्शनाची. असेच योग्य मार्गदर्शन लाभणार आहे ते श्री.स्वामी प्रतीक्षा भक्ती सेवा मंडळ पळसेवाडी सेवेकरी आयोजित दिनांक ३०/११/२०२३ रोजी दुपारी २ वाजता ‘शाश्वत सुखी जीवनासाठी अध्यात्म!’ ही काळाची गरज बनली आहे. सर्वांना या परमात्मा स्वरूपाने दोन शब्द आपल्याशी बोलावेत किंवा आपली विचारपूस करावी, अशी नम्र अपेक्षा असते, या आधुनिक तंत्रज्ञान युगात प्रत्येक जण आपापल्या परीने सुखी जीवनासाठी धडपड करत आहे पण, देवाकडून प्रतिसाद मिळत नाही. म्हणून निराश न होता परमेश्वराची स्तुती उपासना हा आपल्या दैनंदिन जीवनात सुधार होण्याकरिता आपल्या प्रपांच्याच्या जवाबदारी एव्हढच महत्वाचा भक्ती सेवा मार्ग आहे. याबाबतचे प्रबोधनात्मक व्याख्यान ‘शाश्वत सुखी जीवनासाठी अध्यात्म.!’ ज्येष्ठ पत्रकार तथा प्राध्यापक सुपरिचित व्याख्याते प्रा. रुपेश पाटील यांच्या व्याख्यान कार्यक्रमातून होणार आहे. यावेळी मुलांच्या बुध्दीचातुर्य विषयक मार्गदर्शनाचा सारांश अध्यात्मक रूपाने प्रभोधित करण्यात येणार आहे. या संकल्पनेची सर्व सुज्ञ पालकांनी नोंद घ्यावी व सदर कार्यक्रमाचा जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन शाश्वत सुखाची गुरुकिल्ली जाणून घ्यावी, अशी विनंती श्री. स्वामी प्रतीक्षा भक्ती सेवा मंडळ, पळसेवाडी बिबवणे सेवेकरी भक्त मंडळी यांनी केली आहे.





