देवगड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा कोकण विभाग क्रीडा स्पर्धेत डंका.!

43

देवगड : मुंबई विद्यापीठ कोकण विभागीय मैदानी क्रीडा स्पर्धेत देवगड येथील स ह केळकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. विविध स्पर्धांमध्ये १७ विद्यार्थ्यांनी यशस्वी कामगिरी केली .
मुंबई विद्यापीठ आयोजित कोकण विभाग स्तरावरील क्रीडास्पर्धा नुकत्याच डेरवन येथील क्रिडांगणनावर संपन्न झाल्या. या स्पर्धेत देवगड केळकर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारात यश मिळविले यामध्ये धनराज मंगेश गाडे यांनी तिहेरी उडी या प्रकारात प्रथम क्रमांक प्राप्त करत सुवर्णपदक पटकावले नोव्हेंबर मध्ये मुंबई येथे होणाऱ्या क्रीडा स्पर्धेमध्ये त्याची निवड झाली आहे. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल महाविद्यालयाकडून त्यांचे कौतुक करण्यात आले.