सावंतवाडी : कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखातर्फे जिल्हास्तरीय साहित्य संमेलन लवकरच घेण्यात येणार आहे. तसेच आगामी वर्षभरात बाल साहित्य संमेलन व बाल संसद, कथाकथन, लेखन, नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा, कवी संमेलन असे विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत, अशी माहिती कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष ॲड. संतोष सावंत यांनी दिली. सावंतवाडी येथील राणी पार्वती देवी हायस्कूलच्या सभागृहात वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली. यावेळी शाखेच्या पदाधिकारी व सदस्य यांची विविध संस्था तसेच विविध उपक्रमामध्ये निवड झाली. यात जिल्हा ग्रंथालय संघावर सहसचिव पदावर कवी विठ्ठल कदम, विभागीय प्रतिनिधी भरत गावडे, जिल्हा संचालक पदी ॲड. संतोष सावंत, सावंतवाडी तालुका खरेदी-विक्री संघावर संचालक पदी निवड झालेले कोमसापचे सावंतवाडी शाखेचे उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, तसेच त्यांची कन्या आस्था लोंढे हिची तालुकास्तरावर कॅरम स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल, तसेच कोमसापचा युवा वाङ्मय साहित्य पुरस्कार कवयित्री स्वप्ना गोवेकर, वीज ग्राहक संरक्षण जिल्हा उपाध्यक्षपदी कार्य करणारे कवी दीपक पटेकर, महाराष्ट्र राज्यातील विविध संस्था आणि संघटनेवर निवड झालेले ॲड. नकुल पार्सेकर, ॲड. अरुण पणदूरकर, किशोर वालावलकर, मनोहर परब, प्रा. श्वेतल परब, नाट्य अभिनेता अभय नेवगी, डॉ. सोनल लेले, रामदास पारकर, कवी आणि आदर्श शिक्षक व लेखक दत्ताराम सावंत, प्रज्ञा मातोंडकर, प्रा. प्रतिभा चव्हाण, डॉ. दीपक तुपकर. श्रीमती मानसी भोसले, मोतीराम टोपले आदींचा सत्कार करण्यात आला.



यावेळी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. जी. ए. बुवा, सहसचिव राजू तावडे, केंद्रप्रमुख म. ल. देसाई, प्रा. रुपेश पाटील, ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वाय. पी. नाईक, कवयित्री मंगल नाईक-जोशी, ऋतुजा सावंत-भोसले, संतोष पवार, प्रा. डॉ. गणेश मर्गज, सौ. सुहासिनी सडेकर, प्रा. डॉ. एन. डी. कार्वेकर, विकास गोवेकर, निरंजन आरोंदेकर, पार्थ आरोंदेकर, आशा मुळीक, आस्था लोंढे आदि उपस्थित होते.
दरम्यान, यावेळी वर्षभरात विविध साहित्यिक उपक्रम राबवण्याचे ठरले. त्यात ‘गाव व शाळा तेथे कोमसाप’ तसेच लेखन साहित्य, काव्य, नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात साहित्य चळवळ व मराठी भाषा वाढीच्या दृष्टीने साहित्य संमेलन घेण्यात येणार आहे. हे संमेलन सावंतवाडीत घेण्याचे ठरले आहे. स्व. प्रा. मिलिंद भोसले, अॅड. दीपक नेवगी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘साहित्य सामाजिक उपक्रम पुरस्कार’ व साहित्यिक उपक्रम राबवण्याचे यावेळी ठरविण्यात आले. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. खजिनदार डॉ. दीपक तुपकर यांनी जमाखर्च अहवाल सादर केला तर सचिव प्रा. प्रतिभा चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी मोठ्या संख्येने कोमसाप सदस्य, साहित्यिक उपस्थित होते.





