अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्या चार डंपर पकडून ५ लाख ३८ हजाराची दंडात्मक कारवाई.!

47

देवगड : देवगड तालुक्यातील पाटथर मारुती मंदिराजवळ कालावलहून देवगडच्या दिशेने वाळू वाहतूक करणाऱ्या चार डंपर वर देवगड महसूल विभागाकडून कारवाई करण्यात आली. देवगड तहसीलदार रमेश पवार यांच्या नेतृत्वाखाली तलाठी नाडे, सरोदे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पकडलेल्या डंपर मधून सुमारे ५ लाख ३८ हजार रुपये रकमेची दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती देवगड महसूल प्रशासनाकडून देण्यात आली.

देवगड महसूल प्रशासनाकडून बेधडकपणे ही कारवाई शनिवारी पहाटे अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्या चार डंपरवर करण्यात आली आहे.त्यामुळे पुन्हा एकदा अनधिकृत वाळू व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.