शालेय मैदानी स्पर्धेत रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचा डंका.!

115

मालवण : क्रीडा व युवा संचलनालय,पुणे आणि जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग आयोजित त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे या ठिकाणी संपन्न झालेल्या मालवण तालुका शालेय मैदानी क्रीडा स्पर्धांमध्ये स. का. पाटील संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाने घवघवीत यश संपादन केले आहे.

या स्पर्धेत मुलांमध्ये आदेश हाक्के याने 400 मी. धावणे द्वितीय क्रमांक, 3 किमी. धावणे  द्वितीय क्रमांक, गोळाफेक द्वितीय क्रमांक मिळवला.
मिथिलेश खराडे – भालाफेक द्वितीय क्रमांक, साईप्रसाद अटक – 200 मी. धावणे तृतीय क्रमांक तसेच उंच उडी  तृतीय क्रमांक .

तसेच मुलींमध्ये रेश्मा पांढरे यांनी 800 मी. धावणे प्रथम क्रमांक,थाळीफेक : द्वितीय क्रमांक,लांबउडी :  द्वितीय क्रमांक मिळवला.क्षितिजा खरवते 400 मी धावणे द्वितीय क्रमांक , आर्या किडये 100मी. धावणे प्रथम क्रमांक , निर्जरा कांबळी  100 मी हडल्स प्रथम क्रमांक प्राप्त केला.
4×400 मी. रिलेमध्ये मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक प्राप्त केला असून त्यात १) रेश्मा पांढरे, २) क्षितिजा खरवत, ३) आर्या किडये, ४) नियती पारकर यांचा समावेश होता.
तसेच 4×100 मी. रिलेमध्ये मुलींच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला त्यात १) निर्जरा कांबळी, २) दिक्षा झोरे, ३) दिक्षा सुर्वे, ४) साबिया शेख यांचा समावेश होता.
यशस्वी विद्यार्थ्यांची ओरोस येथे होणाऱ्या जिल्हास्तरासाठी निवड झाली आहे.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे श्री. शैलेश पावसकर व प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कनिष्ठ महाविद्यालय समन्वयक व क्रीडा मार्गदर्शक प्रा. हसन खान, प्रा. मिलन सामंत, प्रा. अन्वेशा कदम, प्रा. हर्षदा धामापूरकर, प्रा. स्नेहा बर्वे, प्रा. डॉ. हंबीरराव चौगले, प्रा. शंकर खोबरेकर, प्रा. डॉ. देवीदास हारगिले व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष श्री. बाळासाहेब पंतवालावलकर, सचिव श्री. गणेश कुशे व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. साईनाथ चव्हाण यांनी देखील विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या.