टीम इंडियाकडून पाकिस्तानची धूळधाण! ; विजयी हॅट्रिकसह परंपरा राखली कायम.!

143

अहमदाबाद : वनडे विश्वचषक 2023 मध्ये आज (14 ऑक्टोबर) पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. रोमांचक सामन्याची अपेक्षा असताना यजमान भारतीय संघाने पाकिस्तानला या सामन्यात डोके वर काढू दिले नाही. कामगिरी केल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा व श्रेयस अय्यर यांनी तुफानी फटकेबाजी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. या विजयासह भारतीय संघाने सलग तीन विजय पूर्ण केले. तसेच पाकिस्तानविरुद्ध विश्वचषकातील आपली विजयाची परंपरा कायम राखली.