देवगड येथे उद्या उबाठा सेनेचे ‘होऊ दे चर्चा, विचारा प्रश्न’ अभियान.!

57

देवगड : उबाठा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार देवगड येथे उद्या गुरुवार दि.१२ ऑक्टोबर २०२३ रोजी ‘होऊ दे चर्चा विचारा प्रश्न’ हे अभियान राबविण्यात येणार आहे. यानिमित्त देवगड कॉलेज रोडवरील कॉलेज नाका येथे उद्या सकाळी १०.०० वाजता कॉर्नर सभा आयोजित करण्यात आलेली आहे.

या कॉर्नर सभेला कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत, विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हा प्रमुख नीलम पालव, माजी तालुकाप्रमुख अँड प्रसाद करंदीकर हे उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व शिवसेना, युवासेना व महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी, आजी – माजी लोकप्रतिनिधी, व शिवसैनिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाप्रमुख संदेश पारकर, देवगड तालुकाप्रमुख मिलिंद साटम, तालुकाप्रमुख जयेश नर, उपतालुका प्रमुख बुवा तारी, रवींद्र जोगल, युवासेना उपजिल्हा प्रमुख निनाद देशपांडे, तालुकाप्रमुख गणेश गांवकर, महिला संघटक हर्षा ठाकूर, सायली घाडी, शहर प्रमुख संतोष तारी, प्रमोद वळंजू, सुनील तेली, दत्ताराम तिर्लोटकर यांनी केले आहे.