‘ह्या’ विशेष सरकारी वकिलांचा समृद्धी महामार्गावर अपघात.!

88

नाशिक: समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिकासुरुच आहे. विशेष सरकारी वकील अजय मिसर यांच्या वाहनाला समृद्धी महामार्गावर अपघात झाला.या अपघातात अजय मिसर जखमी झाले आहेत.  त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अजय मिसर हे श्रीरामपूर ते मुंबई  असा नाशिकमार्गे प्रवास करत होते.  दुपारी त्यांचा ताफा समृद्धी महामार्गावरून मार्गस्थ होत होता. घोटी ओलांडल्यानंतर इगतपुरीजवळच्या भरवीर बुद्रूक शिवारात त्यांचे वाहन समोरच्या ट्रकवर जाऊन आदळले. यामुळे त्यांच्या पायांना आणि चेहऱ्याला दुखापत झाली. त्याशिवाय त्यांच्या खांद्याला मुका मार लागला आहे.

या अपघाताची माहिती मिळताच तातडीने पोलिस आणि रूग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. जखमींवर तिथेच प्रथमोपचार देण्यात आले. दरम्यान वकील अजय मिसर यांच्यासह सहाय्यक वकील वाहनचालक यांची प्रकृती स्थिर आहे.