नवी दिल्ली : जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्याच्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने अफगाणिस्तानला 50 षटकात 272 धावांवर रोखले. अफगाणिस्तानकडून कर्णधार शाहीदी याने झुंजार 80 धावांची खेळी केली. तर उमरजाई याने 62 धावांचे योगदान दिले. जसप्रीत बुमराहने अफगाणिस्तानच्या 4 फलंदाजांना तंबूत धाडले तर हार्दिक पांड्याने दोन विकेट घेतल्या. सपाट खेळपट्टीवर भारताला विजयासाठी 273 धावांचे आव्हान आहे.
या सामन्यात निर्णायक विजयाच्या दोन गुणांच्या वसुलीसह आपला नेट रनरेट वाढवण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न राहिल. अफगाणिस्तानसाठी हा सामना जिंकण्याचं आव्हान खूपच कठीण आहे. पण भारताविरुद्धच्या सामन्यात अफगाणिस्तानच्या राशिद खान, मोहम्मद नबी आणि रहमानउल्ला गुरबाज यांच्या कामगिरीवर क्रिकेटरसिकांची नजर राहिल.




