सिक्कीमच्या भीषण पुरात ८ जवानांसह २२ ठार.! ; ३००० पर्यटक अडकले.

95

गंगटोक : सिक्कीमध्ये बुधवारी ढगफुटीनंतर तीस्ता नदीला आलेल्या भीषण पुरात आत्तापर्यंत २२ जण ठार झाले असून यात ८ जवानांचाही समावेश आहे, तर १०२ जण अद्यापही बेपत्ता आहेत. त्याचबरोबर तब्बल ३,००० पर्यटक अनेक मार्ग बंद झाल्याने राज्यातील विविध भागांमध्ये अडकून पडले आहेत. एएनआयनं याबाबत वृत्त दिलं आहे. स्ता नदीवर चुंगथांग इथं धरण उभारण्यात येत असून याच्या तिसऱ्या टप्प्यातलं काम सुरु होतं. यासाठी १२ ते १४ कामगार काम करत होते. या सर्वजण तिथल्या एका बोगद्यात अडकून पडले आहेत. त्याचबरोबर मांगण जिल्ह्यातील चुंगथांग, डिग्चू, गंगटोक जिल्ह्यातील सिंगताम आणि पाकयोंग जिल्ह्यातील रांगपो इथं २६ लोक जखमी तर बारडांग इथं २३ जवान अद्यापही बेपत्ता आहेत.

सिक्कीमचे मुख्य सचिव व्ही बी पाठक यांनी या दुर्घटनेबाबत माहिती देताना सांगितलं की, लोनाक तलावावर मंगळवारी रात्री १०.४२ वाजण्याच्या सुमारास ढगफुटी झाली. त्यानंतर या तलावातील पाण्याला मोठ्या प्रमाणावर उधाण आलं, त्यानंतर हे पाणी थेट तीस्ता नदीच्या पात्रात शिरलं. यामुळं तीस्ता नदीच्या पाण्यानं पात्र सोडून वाहू लागली, त्यामुळं एकूणच भीषण पूरस्थिती निर्माण झाली होती.

या पुराच्या पाण्यामुळं हायवे देखील वाहून गेला आहे. यानंतर राज्य सरकारनं आणखी तीन एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्याचं येणार आहे. सध्या एनडीआरएफची एक टीम रांगपो आणि सिंगतम शहरात तैनात आहेत. या एनडीआरएफच्या टीमनं राज्यातील विविध भागात सुमारे ३००० पर्यटक अडकून पडल्याचं निश्चित केलं आहे.