मानसिक स्थिती बिघडल्याने युवकाची गळफास लावून आत्महत्या.! ; वळीवंडे येथील घटना.

118

देवगड : मानसिक स्थिती बिघडल्याने वळीवंडे घाडीवाडी येथील दत्तात्रय अनंत घाडी (वय 34 याने) मांगरामध्ये नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आपली जीवन यात्रा संपवली. ही घटना शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास त्यांच्या वडिलांचे निदर्शनास आली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वळीवंडे घाडीवाडी येथील दत्तात्रय अनंत घाडी हा अविवाहित होता. गवंडी काम व मोलमजुरी करून तो उदरनिर्वाह करीत होता .घरी आई वडील भाऊ भाऊजय असा परिवार असून दत्तात्रय रात्री जेवण केल्यानंतर दररोज झोपण्यासाठी घराजवळचं काही अंतर असल्या मांगरामध्ये झोपायला जातात असे सांगून गेला. गुरुवार रात्री रात्री साडे दहाच्या सुमारास घरातून न जेवत करता घराजवळ असलेल्या मांगरामध्ये झोपण्यासाठी गेला होता.सकाळीच उशिरापर्यंत तो घरी चहा नाश्ता करण्यासाठी आला नाही म्हणून त्याचे वडील अनंत घाडी हे दुपाची बाराच्या सुमारास मांगराकडे त्याला पाहण्यासाठी गेले. त्यावेळी मांगराला पत्र्याचे छप्पर असल्याने त्याच्या लोखंडी अँगलला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास लावलेल्या स्थितीत तो दिसला. त्यानी तात्काळ घरी येऊन भाऊ गजानन घाडी याला सांगितले . घटनेची खबर गजानन घाडी यांनी देवगड पोलीस स्थानकांत दिल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र कांबळे, पोलीस हवालदार महेंद्र महाडिक यांनी घटनास्थळी जाऊन ग्रामस्थांच्या सहकार्याने गळफास लावलेले अवस्थेत असलेल्या दत्तात्रय याचा मृतदेह काढला. त्यानंतर पंचनामा करून शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे शवविच्छेदन करण्यात आले. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून याबाबत अधिक तपास पोलीस हे. कॉ. महेंद्र महाडिक करत आहेत.