हांगझोऊ : भारतीय बॅडमिंटन पुरूष संघाने नेपाळचा क्वार्टर फायनलमध्ये 3 – 0 असा पराभव करत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. याचबरोबर भारतीय संघाने आपले पदक देखील निश्चित केले. पुरूष संघाने एशियन गेम्समध्ये तब्बल 37 वर्षांनी पदक निश्चित केलं आहे. भारताच्या मिथून मनजुनाथने बिष्णू कटुवालचा तिसऱ्या सामन्यात पराभव केला। आता भारतीय संघ इंडोनेशिया आणि कोरिया यांच्यातील विजेत्यासोबत सेमी फायनलमध्ये भिडणार आहे.
भारताने आज टेनिस पाठोपाठ बॅडमिंटनमध्ये देखील पदक निश्चित केलं आहे. भारताने एशियन गेम्समध्ये सहाव्या दिवशी आतापर्यंत 32 पदके जिंकली आहेत. त्यात 8 सुवर्ण, 12 रौप्य आणि 12 कांस्य पदकांचा समावेश आहे. यातील सर्वाधिक 18 पदके ही शुटिंगमध्ये आली आहेत. यात 6 सुवर्ण 7 रौप्य तर 5 कांस्य पदकांचा समावेश आहे.








