हांगझोऊ : एशियन गेम्समध्ये भारताची सुवर्णपदकांची लयलूट सुरूच आहे. महिलांच्या टीमने सांघिक क्रीडाप्रकारात रौप्य पदक मिळवल्यानंतर, वैयक्तिक स्पर्धेमध्येही चमकदार कामगिरी केली आहे. 10 मीटर एअर पिस्टल क्रीडाप्रकारात 17 वर्षांच्या पलकने गोल्ड मेडल मिळवलं आहे, तर 18 वर्षांच्या इशा सिंगने रौप्य पदक मिळवलं.
यापूर्वी आज सकाळीच 10m एअर पिस्टल महिलांच्या सांघिक स्पर्धेमध्ये दिव्या थडिगोल, इशा सिंग आणि पलक यांनी रौप्य पदक मिळवलं होतं. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील या तिघींचं अभिनंदन केलं आहे. “या तिघींनाही भविष्यातील कामगिरीसाठी शुभेच्छा. त्यांच्या या यशामुळं पुढील अनेक खेळाडूंना प्रेरणा मिळणार आहे.” असं मोदी म्हणाले.









