सावंतवाडी : भाजपचे युवा नेते तथा उद्योजक विशाल परब यांचा वाढदिवसविविध सांस्कृतिक सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात येणार असल्याची माहिती सावंतवाडी येथील आयोजित पत्रकार परिषदेत दत्ता सामंत यांनी दिली
भारतीय जनता पार्टी चे युवा नेते तथा युवा उद्योजक विशाल प्रभाकर परब यांचा वाढदिवस १५ ऑक्टोबर 2023 रोजी विविध सामाजिक सांस्कृतिक उपक्रमांनी साजरा होत आहे. याच पार्श्वभूमीवर सावंतवाडी, कुडाळ व दोडामार्ग या ठिकाणी विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात पॉप सिंगर जुबिन नौटियाल यांच्यासह इंदुरीकर महाराजांच्या किर्तनाचा कार्यक्रम जिल्ह्यात प्रथमच आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती भाजपाचे जेष्ठ नेते दत्ता सामंत यांनी आज सावंतवाडी येथील शिल्पग्राम येथील आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली.
त्यावेळी दत्ता सामंत बोलत होते. यावेळी माजी जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई, माजी नगराध्यक्ष संजू परब, तालुकाध्यक्ष दादा साईल, जिल्हा उपाअध्यक्ष बाळु देसाई, माजी नगरसेवक मनोज नाईक, मोहन सावंत, बंड्या सावंत, प्रकाश मोर्ये, रुपेश कानडे, तेजस माने आदी उपस्थित होते.





