देवगड : ‘स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमांतर्गत पर्यटनस्थळी स्वच्छता अभियान मोहिम तळवडे गावातील प्रसिद्ध धबधबा न्हावळकोंड येथे गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.

यावेळी तळवडे गावातील प्रभारी सरपंच मानसी माणगांवकर,सरपंच पंकज दुखंडे , ग्रा .प सदस्य गणेश लाड , ग्रा.प सदस्य गोपाळ रूमडे , ग्रा.प .सदस्य सुजाता घाडी , पोलीस पाटील अनिल लाड , आरोग्य विस्तार अधिकारी प्रतिमा वळंजु ,ग्रामसेवक वारंग , गटसमन्वयक वैशाली मेस्त्री , पाणी गुणवत्ता तज्ञ हर्षदा बोथीकर, अंगणवाडी सेविका शोभा कुबडे , ललिता दुखंडे , सुनीता मुणगेकर व ग्रामपंचायत कर्मचारी किशोर तळवडेकर, मकरंद घुले, प्राजक्ता भाटकर, रचना धुरी व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

यावेळी न्हावळकोंड धबधब्यात पर्यटकांना सोयी सुविधा उपलब्ध व्हावात याबाबत गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यांनी सरपंच व ग्रामस्थांची चर्चा केली . तळवडे न्हावळकोंड धबधबा प्रवाहित झाल्यापासुन या धबधब्याकडे पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे . विशेषता जिल्हातील व जिल्हाबाहेरील पर्यटकही मोठ्या संख्येने येत असुन चतुर्थीच्या या कालावधीतही मुंबईतील पर्यटकांनीही या धबधब्याला सर्वाधिक पंसती दिली.









