मालवण : मालवण-कुडाळ मार्गावरील धामापूर येथे मालवण महसूल पथकाने अवैध वाळू वाहतूक करणारा कुडाळ येथील डंपर पकडला आहे. पुढील कारवाईसाठी डंपर मालवण तहसील कार्यालय येथे आणण्यात आला आहे. दरम्यान डंपर मालक (कुडाळ) यांना दंडात्मक कारवाईची नोटीस मालवण तहसीलदारांकडून बजावण्यात पाठविण्यात आली आहे. मालवण मंडळ अधिकारी यांच्या अनधिकृत गौणखनिज वाहतूक व उत्खनन विरोधी पथकाने धामापूर येथे वाळू वाहतूक करणारा एमएच ०७ सी ५८९० या क्रमांकाचा डंपर पकडला.






