कणकवली : कणकवली शहरांमधील बहुतांश व्यावसायिकांच्या रिक्षा या सीएनजीवर चालणाऱ्या आहेत. कणकवली तालुक्यातील रिक्षा व्यावसायिकांना ओरोस व फोंडाघाट येथील केवळ दोनच सीएनजी पंप स्टेशनवर अवलंबून राहावे लागते. आणि या दोन्ही सीएनजी पंप स्टेशनवर कधीच पुरेसा सीएनजी उपलब्ध नसतो. त्यामुळे पंप स्टेशनवर सीएनजी नसल्यास रिक्षा व्यवसाय बंद ठेवावा लागतो. तरी आपणास विनंती आहे की, सीएनजी पंप स्टेशनवर पुरेशा प्रमाणात सीएनजी उपलब्ध होण्यासाठी आपल्या मार्फत प्रयत्न व्हावेत, अशी मागणी रिक्षा व्यावसायिकांनी नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.






