देवगड : खुडी पाटवाडी येथील सेवानिवृत्त एलआयसी कर्मचारी चंद्रकांत गंगाराम परब यांच्या घरासमोर ठेवलेल्या त्यांच्या मालकीच्या दोन हिरो होंडा कंपनीच्या दोन ऍक्टिवा दुचाकी गाड्या अचानक लागलेल्या आगीत जळून खाक झाल्या. या घटनेने सुमारे त्यांचे सुमारे ,९० हजारांचे नुकसान झाले आहे. ही घटना १३ सप्टेंबर रोजी सकाळी सातच्या सुमारास निदर्शनास आली.
खूडी पाटवाडी येथील चंद्रकांत गंगाराम परब हे सेवानिवृत्त एलआयसी कर्मचारी आहेत. त्यांनी आपल्या मालकीच्या हिरो होंडा कंपनीच्या दोन ऍक्टिव्हा गाडी आहेत.त्यातील एक गाडी ग्रे तर दुसरी गाडी निळ्या रंगाची आहे. निळ्या रंगाची गाडी ही त्यांच्या मुलीने ते सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या वाढदिवसाला भेट म्हणून दिली होती. त्यांनी दोन्ही गाड्या १२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजनेच्या सुमारास घराच्या परिसरात दोन्ही गाड्या उभ्या करून ठेवल्या होत्या.आज १३ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता घराबाहेर आले असता घरासमोर परिसरात ठेवलेले दोन्ही गाड्या अचानक आग लागून जळाल्याने आगीच्या भक्षस्थानी पडलेले त्यांचे निदर्शनास आले. दोन्ही गाड्या अचानक आग लागून जळाल्याने परब यांचे सुमारे ९० हजाराचे नुकसान झाले आहे. याबाबत त्यांनी देवगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे असून देवगड पोलिसांनी अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला असून देवगड पोलीस उपनिरीक्षक सुधीर कदम हे अधिक तपास करत आहेत.






