कणकवली : तोरसोळे फाटा येथे नुकत्याच झालेल्या अपघातात तळेबाजार मधील मायलेकरांचा मृत्यू झाला आहे. या घडलेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर चांदोशी ग्रामपंचायतीने देवगड चिरेखाण व्यवसायिक यांना पत्र दिले आहे. या पत्रात नमूद केले आहे की चांदोशी येथे चिरे व्यवसाय करत असून आपण आपल्या चिरे खाणीमधून मल्टी एक्सेल (६ चाकी वाहन) वाहनांमधून चिरे वाहतूक करू नये. अशा परजिल्ह्यातून,परराज्यातून येणाऱ्या जास्तीत जास्त लांबीच्या ट्रक मुळे भीषण अपघात होऊन लोक मृत्युमुखी पडले आहेत. तरी यापुढे आपल्या चिरेखाणीतून मल्टीएक्सेल (६ चाकी वाहन) वाहनांमधून चिरे वाहतूक होताना आढळल्यास आपला चिरेखाण व्यवसाय बंद करण्यासंबंधी कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच दिनांक ९ सप्टेंबर २०२३ रोजी अशाच ट्रकमुळे झालेल्या भीषण अपघातानंतर स्थानिकांचा रोष पाहता अशाचं बाहेरून आलेल्या मल्टी एक्सेल वाहनांचा बाबतीत ग्रामस्थ आक्रमक झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील याची नोंद घ्यावी. अश्या आशयाचे पत्र चांदोशी ग्रामपंचायतीने चिरखाण व्यवसायिक चालक-मालक यांना दिले आहे.






