देवगड : शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचालित माध्यमिक शिक्षण शाळा, कोळोशी- हडपीड प्रशालेच्या मैदानावर देवगड तालुका शालेय कबड्डी स्पर्धा नियोजनबद्ध पद्धतीने संपन्न झाल्या.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे द्वारा पुरस्कृत व सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा परिषद आणि देवगड क्रीडा व्यस्थापन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित देवगड तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा मोठया उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धा. १४, १७, १९, वर्षाखालील मुला-मुलींच्या गटातून घेण्यात आल्या. तालुक्यातून सुमारे ६० संघाने विविध गटातून सहभाग नोंदवला.

या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई कार्यकारिणी मंडळाचे कार्याध्यक्ष पांडुरंग धनाजी कदम, सचिव राकेश बाबाजी पवार, बबन साबाजी इंदप, तसेच शाळा समितीचे चेअरमन किशोर भालचंद्र राणे, सदस्य चंद्रकांत शिंदे, सुभाष इंदप, संतोष चव्हाण, शिवाजी गुरव, शंकर राणे, दाजी राणे, त्याचबरोबर हडपीड गावच्या सरपंच सौ. संध्या राणे. पोलीस पाटील दिलीप राणे, ग्रा.पं. सदस्य अनंत हडपीडकर श्रीमती सुषमा कदम, असलदे पोलीस पाटील सौ. पाताडे मॅडम, डॉ. चंद्रकांत अर्जुन पुरळकर, प्रा. आरोग्य केंद्र शिरगांवच्या आरोग्य सेविका सौ. महेंद्रकर मॅडम, पेंढरी हायस्कूलचे मुख्याध्यापक लाडगांवकर सर, माजी क्रीडा शिक्षक आर.के.जाधव, विश्वनाथ कदम, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेत्तर वृंद, कोळोशी व हडपीड गावचे ग्रामस्थ इत्यादी उपस्थित होते.
या कबड्डी स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे
• वयोगट १४ वर्षे मुले
१.महात्मा गांधी विद्यामंदिर तळेबाजार- प्रथम
२. श्री.मो.गोगटे. माध्यमिक विद्यामंदिर जामसंडे- द्वितीय
३.माध्यमिक विद्यालय फणसगांव- तृतीय
• वयोगट १४ वर्षे मुली
१.अनंत कृष्णा केळकर हायस्कूल वाडा- प्रथम
२.एस. बी. राणे हायस्कूल नारिग्रे- द्वितीय
३.माध्यमिक विद्यालय फणसगांव- तृतीय
•वयोगट १७ वर्षे मुले
१. शा.वि. कुळकर्णी. माध्य व कनिष्ट महाविद्यालय मोंड -प्रथम
२) शिरगांव हायस्कूल शिरगांव -द्वितीय
३.माध्यमिक विद्यामंदिर कुणकेश्वर – तृतीय
•वयोगट १७ वर्षे मुली-
१.श्री. मो. गोगटे .माध्य. विद्यामंदिर, जामसंडे – प्रथम
२.पंचक्रोशी माध्य.विद्यामंदिर पेंढरी-द्वितीय
३.माध्य. विद्यालय फमसगांव-तृतीय
•वयोगट १९ वर्षे मुले
१.श्रीम. न. शां.पंतवालावलकर कॉलेज देवगड -प्रथम
२.कनिष्ठ महाविद्यालय शिरगांव-द्वितीय
३.माध्यमिक विद्यालय फणसगांव-तृतीय
•वयोगट १९ वर्षे (मुली)
१.कनिष्ठ महाविद्यालय शिरगांव -प्रथम
२.माध्यमिक विद्यालय फणसगांव-द्वितीय
३.श्रीम.न. शां. पंतवालावलकर कनिष्ठ महाविद्याल तृतीय
या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या सांगता समारंभाला देवगड तालुक्याचे पोलीस निरिक्षक निळकंठ बगळे यांच्या हस्ते सर्व विजेता-उपविजेता संघाना स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित केले.
या कबड्डी स्पर्धा देवगड तालुका क्रीडा समन्वयक उत्तरेश्वर लाड यांच्या नियोजनाखाली यशस्वी पार पाडण्यासाठी, पारकर सर, पुरुषोत्तम साटम, आदिनाथ गर्जे, सुतार सर, पाताडे सर व प्रशालेचे मुख्याध्यापक दिनकर करडे यांनी परिश्रम घेतले.
कबड्डी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तालुक्यातील पंच म्हणून दीपक चव्हाण, मयूर राणे, महेश जाधव, बाळासाहेब ढेरे, सागर फाळके, रुपेश बांदेकर, शुभम धुरी, आकाश पारकर, ज्ञानेश्वर कुंभरे यांनी काम पाहिले. स्पर्धेतील विजेत्या-उपविजेत्या संघाना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे आभार बाळासाहेब ढेरे यांनी मानले.






