सावंतवाडी : संपूर्ण देशात सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून परिचित आहे. त्यामुळे पर्यटकांना इथे पर्यटनाची सुवर्ण संधी उपलब्ध करून देणे हे अत्यंत गरजेचे असते., तसेच काही देश हे पर्यटनाच्या जीवावर चालतात. त्यामुळे अशी संधी जर आपण या जिल्ह्यात पर्यटकांना उपलब्ध करून दिल्या तर आपल्या जिल्ह्यातील तरुणांना देखील रोजगाराची संधी उपलब्ध होईल, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज येथे केले.
दरम्यान आज केसरी येथे पहिल्या मत्स्यालयाचा शानदार शुभारंभ श्री. दत्तात्रय चव्हाण यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला . यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी मंत्री चव्हाण पुढे म्हणाले की, जिल्ह्यात नव्या मत्स्य प्रजात तयार झाल्या तर त्याचा देखील मार्केटिंग आपल्या सर्वांना करता येऊ शकतो. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मत्स्य संपदा योजना ही जाहीर केली आहे. त्यात दहा हजार कोटीपेक्षा जास्त मत्स्य योजनेमध्ये देण्याचा ठरवलं होतं. त्यामुळे अशा प्रकारचे रंगीत मासे त्याच्यामध्ये असणारे व्हरायटीज तयार करणे हा एक चांगला उद्योगाची संधी होणाऱ्या काळामध्ये होऊ शकतो, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

तसेच मंत्री रवींद्र चव्हाण पुढे म्हणाले सिंधुदुर्गमध्ये 200 ते 300 रंगीत माशांवर काम करणारे मुले आहेत. आजही त्यांना सिंधुदुर्गमध्ये काम करायचे आहे, परंतु त्या सर्वांना मार्केट उपलब्ध नाहीत. त्यामुळे एखादी जिल्ह्याची ओळख अशा पद्धतीने वरती यायला लागली तर इथे येऊन लोकं त्याची खरेदी विक्री करू शकतात. त्यामुळे हा विषय एका वेगळ्या पद्धतीने करण्याचा विचार आम्ही केलाय, असे देखील श्री. चव्हाण यावेळी म्हणाले.






