सिंधुदुर्गनगरी : आलिशान सफारी गाडी व तीन लाख 70 हजाराची गोवा बनावटीची अवैध दारू स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्गच्या पथकाकडून जप्त करण्यात आली आहे. आज रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, लक्ष्मण साळुंके, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र जामसंडेकर, आशिष गंगावणे, प्रमोद काळसेकर, बत्याव डिसोझा, पोलीस नाईक आशिष जामदार, अमित तेली व पोलीस कॉन्स्टेबल यशवंत आरमारकर यांनी खालील प्रमाणे कारवाई केलेली आहे.
(1) पोलीस ठाणे- कणकवली
(2) आरोपी नाव, वय, पत्ता –
1) स्वप्निल उर्फ मुन्ना भिमराव वसेकर, वय 25 रा. टाकळी सिकंदर, उजनी कॉलनी, ता.-मोहोळ जिल्हा-सोलापूर
2) शहाजी पठाण गायकवाड, वय-21, रा. टाकळी सिकंदर, भीमा सहकारी साखर कारखान्याजवळ, ता.मोहोळ जिल्हा-सोलापूर
(3) गुन्हा घडला तारीख, वेळ, ठिकाण
दि. 11/09/2023 रोजी 12.20 वा. चे दरम्याने ओसरगाव टोल नाका, मुंबई-गोवा हायवे वर ता. कणकवली येथे
(4) मिळाला माल-
1) रु. 8,00,000/-रू. किमतीची सफारी गाडी
2) रू.3,69,600/- रू. किंमतीची गोवा बनावटीची दारु.
एकूण 11,69,600/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
आरोपी विरुद्ध कणकवली पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 (अ)(इ), 81,83 व मोटर वाहन कायदा कलम 3(1)/181, 139/177 अन्वये गुन्हा नोंद केलेला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस निरीक्षक संदीप भोसले, स्थानिक गुन्हे अन्वेषण सिंधुदुर्ग शाखेचे महेंद्र घाग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे





