सावंतवाडी : तालुक्यातील मळेवाड जकातनाका येथे दुचाकी स्वाराचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने आज रात्री साडे आठ वाजताच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार मनोज मुळीक (रा. धाकोरा) हे गंभीर दुखापतग्रस्त झाले आहेत. त्यांच्या उजव्या डोळ्यावरील भागाला दुखापत झाली असून डाव्या पायालाही किरकोळ दुखापत झाली आहे. प्राथमिक उपचारासाठी त्यांना मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र तेथून अधिक उपचारासाठी युवा मित्र मंडळ, मळेवाड कोंडूरेच्या रुग्णवाहिकेने त्यांना गोवा येथील बांबोळी येथे हलविण्यात आले आहे.





