मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात तात्काळ दुसरा MBBS डॉक्टर नियुक्त करा.! ; उपसरपंच हेमंत मराठे यांची मागणी .

95

सावंतवाडी : मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात तात्काळ दुसरा एमबीबीएस डॉक्टर नियुक्त करा, अशी मागणी मळेवाड – कोंडूरे ग्रामपंचायतचे उपसरपंच हेमंत मराठे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे केली आहे.
मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात नव्याने हजर झालेले डॉ. चौवरे हे बॉण्डवर हजर झाले असून त्यांची मुदत संपत असल्याचे समजते. त्यामुळे नवीन बॉण्डमध्ये नेमणूक होणाऱ्या डॉक्टरामध्ये मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन एमबीबीएस डॉक्टरांची नेमणूक करावी, अशी मागणी मराठे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सईदरी यांना निवेदन देऊन केली आहे.

तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर वीज पुरवठा व्हावा, यासाठी जोडलेले इन्वर्टर बॅटरी संच खराब झाला असल्याने वीज खंडित झाल्यावर इन्व्हर्टर बॅटरीने पुरवठा होत नाही. तरी इन्व्हर्टर व बॅटरी दुरुस्त करून मिळाव्यात, अशी देखील मागणी मराठे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.