कणकवली : संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सन २०२० २०२१ व २०२१-२०२२ शौचालय व्यवस्थापन या विषयात जिल्हास्तर स्पर्धेत कणकवली तालुक्यातील ग्रामपंचायत असलदे यांनी उत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल स्व. वसंतराव नाईक पुरस्कार (शौचालय व्यवस्थापन) विशेष पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. अतिरीक्त मुख्यकार्यकारी अधीकारी संजय कापडणीस, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, वितलेखा अधिकारी गावडे यांच्या हस्ते सरपंच चंद्रकांत डामरे, माजी सरपंच पंढरी वायंगणकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.





