Home ब्रेकिंग न्यूज धाकोरे शाळेत तृणधान्य पाककला स्पर्धा, रानभाज्या प्रदर्शन.! ; प्राथमिक शाळा धाकोरे नं...

धाकोरे शाळेत तृणधान्य पाककला स्पर्धा, रानभाज्या प्रदर्शन.! ; प्राथमिक शाळा धाकोरे नं १, अंगणवाडी यांचे संयुक्त आयोजन.

61

सावंतवाडी :  तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धाकोरे नं. १ शाळेत तृणधान्य पाककला व रानभाज्या प्रदर्शन कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यशश्री विकास पवार होत्या. रानभाज्या प्रदर्शन व स्पर्धेचे उद्घाटन धाकोरे ग्रा. पं. सरपंच सौ. स्नेहा निलेश मुळीक यांच्याहस्ते झाले. यावेळी  स्नेहा मुळीक यांनी सहभागी सर्व स्पर्धकांना मार्गदर्शन केले. आजच्या फास्ट फूडच्या जमान्यात घरातील विविध पारंपारिक पदार्थ लुप्त होत आहेत. मानवाच्या जीवनासाठी आवश्यक घटक घरगुती पदार्थामध्ये आहेत. फास्टफूडचा जीवनावर विपरीत परिणाम होतो. त्यामूळे सर्वांनी आपल्या कुटुंबियांना घरगुती पदार्थ बनवून दिल्यास त्यांचे आरोग्य चांगले राहील, असे सौ. मुळीक यांनी मार्गदर्शन केले.

‘रानभाज्यांमध्ये एका पानाची भाजी, अळू, कुरडू, सुरण, टाकळा, सुबांबू, ओवा, टेरी, इ. भाज्या प्रदर्शनात मांडल्या होत्या. तृणधान्य पाककला स्पर्धेत एकूण 22 स्पर्धकांनी भाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये सौ. यशश्री विकास पवार – प्रथम, सौ. वेदिका वसंत मुळीक – द्वितीय, सौ. पूजा हरेश कोठावळे तृतीय. यांनी प्रथम क्रमांक पटकावले. या स्पर्धेचे परिक्षण बचत गटाचे सी. आर. पी. श्रीम. अपर्णा अच्युत राळकर व श्रीम. अपर्णा आनंद राळकर यांनी केले. सर्व सहभागी स्पर्धकांचे व विजयी स्पर्धकांचे मुख्याध्यापक दिलीप जाधव यांनी आभार मानले.