कणकवली : कनेडी पंचक्रोशी ग्राम वाचनालय नूतन इमारतीचे उद्घाटन आमदार नीतेश राणे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी आमदार नीतेश राणे यांनी वाचनालयाच्या उर्वरीत इमारतीसाठी १० लाखाचा निधी देण्याचे जाहीर केले. तर वाचनालयाच्या एकूणच कामाचे आमदार नितेश राणेंनी कौतुक केले. यावेळी युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित निबंध, हस्ताक्षर व वक्तृत्व स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी बहुसंख्येने शिक्षक व विद्यार्थी व शिक्षण प्रेमी, पालक उपस्थित होते. कार्यक्रमानंतर आमदार निरंजन डावखरे यांनी वाचनालयाला भेट देत शूभेच्छा दिल्या.





