प्रा.आनंदी घोगळे यांना शिक्षण मंत्री दीपक केसरकर मित्र मंडळाचा ‘गुरुसेवा गौरव विशेष शैक्षणिक सेवा पुरस्कार’ जाहीर.!

154

मालवण : येथील टोपीवाला अध्यापक विद्यालयाच्या उपक्रमशील शिक्षक – प्रशिक्षिका आणि सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या आदर्श शिक्षिका प्रा.आनंदी रघुनंदन घोगळे यांना राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर मित्र मंडळामार्फत दिला जाणारा ‘गुरुसेवा गौरव विशेष शैक्षणिक सेवा पुरस्कार’ सन 2023 जाहीर झाला आहे.

शैक्षणिक क्षेत्रात बहुमुल्य योगदान देणाऱ्या उपक्रमशील अशा प्रत्येक तालुक्यातून प्राथमिक विभागातून एक शिक्षक व एक माध्यमिक शिक्षकांचा गौरव केला जातो. यंदा पुरस्काराचे बारावे वर्ष असून पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्हव ग्रंथ असे असणार आहे. लवकरच मान्यवरांच्या हस्ते प्रा. घोगळे यांना पुरस्कार प्रदान केला जाणार असल्याचे आयोजकांनी कळविले आहे.

पुरस्कारप्राप्त प्रा. सौ. घोगळे यांचे संस्थेचे अध्यक्ष, सर्व संचालक, शालेय समितीचे अध्यक्ष, सर्व सदस्य, विद्यालयाचे प्राचार्य, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बांधव, विद्यार्थी तसेच समाजातील सर्व स्तरावरुन अभिनंदन होत आहे.