सावंतवाडी : ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे कार्यालयात आज वीज वितरण चे वेंगुर्ला शाखेचे उपकार्यकारी अभियंता वाघमोठे यांच्या उपस्थित ग्राहकांची बैठक संपन्न झाली.
ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे कार्यक्षेत्रामध्ये ग्राहकांच्या अनेक अडचणी होत्या.या संदर्भात वारंवार पाठपुरावा करूनही कोणतेही ठोस कार्यवाही न झाल्याने आज मळेवाड कोंडुरे ग्रामपंचायत कार्यालयात वीज वितरण चे उपकार्यकारी अभियंता वाघमोठे यांच्या उपस्थितीत मळेवाड कोंडूरे गावातील ग्राहकांची बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत ग्राहकानी आपल्या अनेक तक्रारी मांडल्या.तसेच वायरमन यांच्या कामात सुधारणा करण्यासंदर्भातही ग्रामस्थांनी वाघमोठे यांच्याकडे मागणी केली.यावेळी वाघमोठे यांनी वीज वितरणच्या मार्फत आपण लोकांना चांगली सेवा देणे हे क्रमप्राप्त असून ते आपलं कर्तव्य आहे आणि त्यात कोणतीही कसूर करू नका असे वायरमन व वीज वितरण अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.मळेवाड कोंडुरे गावामध्ये ज्या विजेच्या समस्या आहेत त्यातील प्राधान्य क्रमाने ज्या समस्या आहेत त्या लवकरात लवकर सोडवून देण्याचे आश्वासन वाघमोठे यांनी दिले.तसेच मळेवाड नाईकवाडी येथील ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्याने गेले कित्येक दिवस नाईकवाडी परिसरात व्होल्टेजची समस्या भेडसावत आहे.सदर ठिकाणी उद्या नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्याचेही आश्वासन दिले.यावेळी ग्रामपंचायत सरपंच मिलन पार्सेकर,उपसरपंच हेमंत मराठे,सदस्य अमोल नाईक,मधुकर जाधव,महेश शिरसाट,गुरुनाथ मुळीक,अमित नाईक,रमाकांत नाईक,प्रवीण नाईक,सहाय्यक अभियंता विहिरे तसेच ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





