गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर देवगड – जामसंडे नगरपंचायतीची विशेष नियोजन सभा संपन्न.!

65

देवगड : देवगड जामसंडे नगरपंचायतीची विशेष सभा नगरपंचायत सभागृहात नगराध्यक्ष साक्षी प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली .या सभेत गणेशोत्सवाच्या अनुषंगाने कशा पद्धतीने शहरात देवगड जामसंडे शहराचे नियोजन करण्यात आले याबाबतची नियोजन सभा संपन्न झाली. देवगड जामसंडे नगरपंचायत १७ प्रभाग असून प्रत्येक प्रभागामध्ये सफाईकरता एक कर्मचारी नियुक्त केलेला आहे. तसेच घंटागाडी मार्फत सर्व विभागातील घनकचरा संकलन करण्याचे काम केले जात आहे. सद्यस्थितीत प्रभाग १ ते ६ व १३ प्रभागांची गवत कापणी करण्यात आलेली आहे. प्रभाग ७ प्रगतीपदावर आहेत उर्वरित सर्व प्रभागातील रस्त्यांच्या दुतर्फा असलेले गवत सफाईचे काम १५ सप्टेंबर पर्यंत पूर्ण करण्यात येईल. नगरपंचायत कार्यक्षेत्रात देवगड व जामसंडे या ठिकाणी बाजारपेठ असून येथे वाहनाची मोठी कोंडी होते ती वाहनाची कोंडी होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था राखली जावी यासाठी बाजारपेठेंमध्ये नगरपंचायत मार्फत जामसंडे वाडातर रोड, देवगड कॉलेज नाका,देवगड बालोद्यान शेजारी असे तीन ठिकाणी पार्किंग व्यवस्था केली आहे नगरपंचायत कार्यक्षेत्रात एकूण १८ गणेश घाट असून प्रत्येक घाटाची साफसफाई करण्यात आली असून प्रत्येक घाटावर रस्ता पायवाट याचीही साफसफाई केलेली आहे गणेश विसर्जन साठी प्रत्येक घाटावर एक कर्मचारी नियुक्त कर्मचारी निर्माल्य कलशामध्ये जमा करेल. त्याचप्रमाणे धोक्याच्या ठिकाणी गणेश घाटावर सुरक्षारक्षकांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे. शक्य असल्यास निर्माल्य कलश देखील गणेश घाटावर उपलब्ध करून ठेवला जाईल. असेही यावेळी नगरसेविका सौ तन्वी चांदोस्कर यांनी सांगितले देवगड जामसंडे शहरात एकही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ नसले तरी घरोघरी असणाऱ्या गणेशोत्सव सण व्यवस्थित शांततेत साजरा केला जाईल. कुठल्याही प्रकारे नागरिकांना त्रास होणार नाही याची व्यवस्था देखील नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे शहरातील वीजपुरवठ्याचे काम पूर्ण झाले असून गणेश चतुर्थीच्या कालावधीत विद्युत पुरवठा सुरळीत चालू राहणार आहे तसेच पाणीपुरवठ्याची पाईपलाईन देखील नादुरुस्त होती ती देखील दुरुस्त करून देण्यात आलेली असून लवकरच देवगड जामसंडे शहराला देखील पाणीपुरवठा सुरळीत होईल गणेश चतुर्थी कालावधीत पाणी टंचाई भासणार नाही याची काळजी देखील नगरपंचायत प्रशासनाने घेतली आहे. नगरपंचायत कार्यक्षेत्रात रस्त्यांची पाहणी करत रस्त्यावर खड्डे पडलेले खड्डे बुजवण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून त्यानुसार गणेश चतुर्थी पूर्वी हे सर्व खड्डे बुजविण्यात येणार असल्याचेही यावेळी नगरपंचायत मुख्याधिकारी यांनी सांगितले या बैठकीस उपनगराध्यक्ष मिताली सावंत देवगड तालुका व्यापारी संघाचे शैलेश कदम जामसंडे शहराचे व्यापारी अध्यक्ष राजू पाटील पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे पाणीपुरवठा कर्मचारी सूर्यवंशी, संदीप पवार ,वीज वितरण विभागाचे शहर अभियंता सौ शिल्पा माने, सर्व नगरसेवक नगरसेविका आधी उपस्थित होते. गणेशोत्सव कालावधीत येणाऱ्या भाविकां भाविकांना वाहन चालकांना कोणत्याही प्रकारची त्रास होणार नाही याची काळजी नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने घेण्यात आली आहे