कणकवली : शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे राज्य नेते शिवाजी खांडेकर यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर कर्मचारी संघटनांच्या राज्य महामंडळाचे राज्य सहकार्यवाह सामाजिक कार्यकर्ते शिवाजी खांडेकर सिंहगड हायस्कूल पुणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राज्य सरचिटणीस पदी बिनविरोध निवड झाली असल्याने महाराष्ट्र राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे एक शिक्षकेतरांचा अभिमान म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेतर्फे सातारा येथील पुणे विभाग माध्यमिक शाळा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्था सातारा येथे त्यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला यावेळी अध्यक्ष अनिल राणे, सचिव गजानन नानचे, राज्य संघटक निलेश पारकर, शाबी तुळसकर, प्रदीप सावंत, विजय गवस व राज्यातील शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Home महाराष्ट्र कणकवली शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे राज्य नेते शिवाजी खांडेकरांचा सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेतर्फे सत्कार.!...





