जालना : मराठा आंदोलकांकडून जालन्यात सुरू असलेल्या आंदोलनावर तोडगा निघालेला नाही. तसेच लाठीचार्जनंतर खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने जमावबंदीचा निर्णय घेतला आहे. जालना जिल्ह्यात आजपासून (दि.4) सकाळी 6 वाजल्यापासून ते 17 सप्टेंबर रात्री 12 वाजेपर्यंत जमावबंदीचा आदेश देण्यात आलाय. जमावबंदीच्या आदेशामुळे श्रीकृष्ण जयंती, गोपाळकाला, पोळा आणि मुक्तीसंग्राम दिनानिमित्त कार्यक्रम रद्द करावे लागणारेत. आज सकाळी 10 वाजता चिपळूण येथे सकल मराठा समाजाच्या वतीने निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.





