मुंबई : आजपासून तलाठी भरती परीक्षा सुरू होत आहे. तिसऱ्या सत्रातील ही तलाठी भरती परीक्षा 14 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. जालन्यात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरूच आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज जालन्यात येऊन जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत. तर भाजप त्या पंकजा मुंडे यांचा आजपासून शिवशक्ती दौरा सुरू होत आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून त्या राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. जालना लाठीमाराच्या घटनेच्या निषेधार्थ पुण्यात आज महाविकास आघाडीकडून आंदोलन करण्यात येणार आहे. जालन्यातील घटनेच्या निषेधार्थ आज मराठा मोर्चाने कल्याण बंदची हाक दिली आहे.





