तालुकास्तरीय विविध क्रीडा स्पर्धेत मिलाग्रीस हायस्कूलचा डंका..!

144

सावंतवाडी : खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल बांदा येथे नुकत्याच पार पडलेल्या तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत १९ वर्षांखालील मुलांच्या गटात प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला व त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या संघास प्रशालेच्या क्रीडा शिक्षिका शेरॉन अल्फान्सो यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

तसेच नाबर विद्यालय बांदा येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांनी अभिनंदन केले. खेळाडूंना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉन बॉस्को स्कूलचे फादर रोनाल्डो वाझ , प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सिस्टर मेबल, पर्यवेक्षिका सौ. मेघना राऊळ तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.