मुंबई : मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अनेक मल्याळम चित्रपट आणि टेलिव्हिजन कार्यक्रमांमध्ये दिसलेली अभिनेत्री अपर्णा पी. नायर ही करमना थाली येथील तिच्या घरी मृतावस्थेत आढळून आली. तिच्या मृत्यूचा बातमीने चाहत्यांना धक्का बसला आहे. अपर्णा ही तिच्या घरी मृतावस्थेत आढळून आली.ती 31 वर्षांची होती. तिचा मृतदेह पीआरएस रुग्णालयात हलवण्यात आला.
गुरुवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास अपर्णा तिच्या घरी लटकलेल्या अवस्थेत आढळली. आई आणि तिची बहीण तिच्या मृत्यूच्या वेळी उपस्थित होते. त्यानंतर तिचा मृतदेह पीआरएस रुग्णालयात हलवण्यात आला. तेथील स्थानिक अधिकाऱ्यांनी मृत्यूची नोंद केली असून पोलिसांनीही तिच्या मृत्यूचा तपास सुरू केला आहे.
अपर्णाच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नसले तरी तिच्या मृत्यूची बातमी पोलिसांना मिळताच त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिस अपर्णाचे मित्र आणि नातेवाईकांचे जबाब घेतले आहेत. अपर्णाचे लग्न संजीथ शी झाले होते. अपर्णाला थ्राया आणि कृतिका या दोन मुली आहेत. तिने तिच्या मृत्यूच्या काही तास आधी तिने इंस्टाग्रामवर तिच्या धाकट्या मुलीचा एक फोटो व्हिडिओ पोस्ट केला आहे. तिच्या निधनाने तिच्या कुटूंबियांसह चाहत्यांनाही धक्का बसला आहे.





