केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे रवींद्र तिर्लोटकर यांनी केली ‘ही’ महत्वपूर्ण मागणी.!

125

देवगड : देवगड पंचायत समितीचे माजी उपसभापती रवींद्र तिर्लोटकर यांनी माजी आमदार अजित गोगटे यांच्या समवेत नुकतीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत दरम्यान झालेल्या चर्चेत त्यांनी देवगड तालुक्यातील एतिहासिक विजयदुर्ग किल्ल्यावर अनेक देशी विदेशी पर्यटक येत असतात. सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असल्याने विजयदुर्ग किल्ल्याला पर्यटन दृष्ट्या खूप महत्व आले आहे. याशिवाय याच किल्ल्यावर जागतिक हेलियम वायूचा शोध देखील लागला असल्याने एतिहासिक व वैज्ञानिक इतिहासाची प्राप्त झाल्याने विजयदुर्ग गावाला खूप महत्व आले असल्याने आणि याठिकाणी होत असलेली पर्यटकांची वर्दळ लक्षात घेता येथील विजयदुर्ग ते वैभववाडी हा रस्ता टू लेन होणे अपेक्षित आहे. त्याचबरोबर एतिहासिक विजयदुर्ग किल्ला ते मालवण सिंधदुर्ग किल्ला अशी मिनी ट्रेन चालू करावी, अशा आशयाचे निवेदन या भेटी दरम्यान दिले. यावेळी माजी आमदार अजित गोगटे, भाजपा देवगड तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर उपस्थित होते.