ठाणे : शहरात आर्थिक व्यवहारातून एका तरुणाची हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे. अक्षय ठुबे असं तरुणाचं नाव असून तो शिवसेना शिंदे गटाचा उपशाखा प्रमुख होता. अक्षय ठुबे हा २९ ऑगस्टपासून गायब होता. आर्थिक व्यवहारातून ही हत्या करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. याप्रकरणी पोलिसांनी ३ जणांना अटक केली आहे.





