मालवण : केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे, प्रदेश सदस्य दत्ता सामंत यांच्या माध्यमातून शासन स्तरावर मंजूर झालेल्या ओपन जिम प्रकल्पाचा शुभारंभ मालवण तालुक्यातील शिरवंडे, निरोम, बुधवळे गावात करण्यात आला. माजी सभापती सुनील घाडीगांवकर, माजी वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर, बाळा राऊत यांचा पाठपुरावा ओपन जिम प्रकल्प मंजुरीत महत्वाचा ठरला, अशी माहिती ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आली आहे.





