कणकवली : उत्कृष्ट बाल कलाकार होण्याकरिता सर्वंकष परफॉर्मन्स द्यावा लागतो. हा परफॉर्मन्स सादर करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. बालकलाकाराचा परफॉर्मन्स रसिकांच्या आवडतो, तेव्हा तो ग्लॅमर कलाकार म्हणून नावारुपास येत असतो, असे प्रतिपादन नाट्य शास्त्राचा अभ्यासक तथा उत्कृष्ट अभियन करणार कालाकार निनाद उचले यांनी केले. येथील विद्यामंदिर प्रशालेत कलाकार विषयक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक, पी.जे.कांबळे, पर्यवेक्षक सौ. जाधव,अच्युत वणवे, प्राथमिक विभागातील सर्व शिक्षक वर्ग, सांकृतिक विभाग प्रमुख जे. जे. शेळके उपस्थित होते.
इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी गोष्टरंगायन हा अभिनय कलेच्या क्षेत्रातील अभिनव कलाविष्कार असलेला बालकांसाठी महत्वाचा कार्यक्रम निनाद आणि सहकलाकार यांच्या मदतीने तयार केलेला आहे. बालरंगभूमी आणि बालकलाकार यांचा समन्वय साधणारी ही कार्यशाळा, विद्यामंदिरच्या प्राथमिक विभागासाठी वरदानच ठरणार असून निनाद उचले याने सुंदर गोष्टींचे नाट्य रुपांतर करून स्वतः दिग्दर्शन केलेले गोष्ट रंगायन हा बहारदार कार्यक्रम आखून बालकांच्या मनाचा तळाचा शोध घेण्याचा तो एक प्रयत्न सुरु आहे. यासह कार्यशाळेतून शब्दांचे उच्चार, शब्द फेक, शब्दांची आवाजातील पकड, संवाद तंत्र आणि देहबोलीचे महत्त्व बालकलाकारांच्या भूमिकेत उतरविणे हा उद्देश आहे.





