वाशिंग्टन : भारतीय वंशाचे उद्योगपती विवेक रामास्वामी हे अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठी ताकद म्हणून समोर आले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनीही त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या अनुपस्थितीत तज्ज्ञ हे रामास्वामी यांना सर्वोच्च उमेदवार म्हणून पाहत आहेत. खुद्द डोनाल्ड ट्रम्प अनेकदा त्यांची स्तुती केली आहे. डोनाल्ड ट्रम्पचे चाहतेही रामास्वामी यांना पाठिंबा देत असल्याची माहिती आहे.





