विद्यामंदिर प्रशालेत चांद्रयान- ३ च्या दृश्यांचे प्रसारण ; बालकांच्या जिज्ञासा वृत्तीस शिक्षकांचे मार्गदर्शन.

59

कणकवली : भारताची चांद्रयान ३ मोहिम यशस्वीरित्या पूर्ण झाली. चांद्रयान ३ चंद्राच्या कक्षेत उतरतांना संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणारी ठरली भारत चांद्रयान मोहिमेचा जगातील चौथ्या क्रमांकांचा देश ठरला आहे. भारतीय शास्रज्ञाचे हे कठोर परिश्रम संपूर्ण जगात यशस्वी ठरले आहेत. इस्रोचे सर्व संशोधक अव्वल ठरले आहेत.

विद्यामंदिर प्रशालेत चांद्रयान- ३ ची यशस्वी मोहिम इयत्ता पहिली ते चौथी आणि पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना दाखविण्यात आली. लहान बालकांची जिज्ञासा वृत्ती चांद्रयान – ३ मोहिम पहातांना दिसून आली. अनेक विद्यार्थ्यांनी उत्सुकतेने बरेच प्रश्न विचारून शंका समाधान व्यक्त केले. प्रशालेचे विज्ञान शिक्षक श्री. बर्डे यांनी उत्कृष्ट नियोजन करून चांद्रयान – ३ या मोहिमेची सर्व दृश्ये विद्यार्थांना दाखवत उकृष्ट असे मार्गदर्शन केले. यावेळी मुख्याध्यापक पी.जे. कांबळे,  यांसह प्राथमिक विभागाचे मयुर जाधव, श्री. हरकुळकर, सौ. नौकुडकर मॅडम आदी उपस्थित होते.