अज्ञात व्यक्तीकडून आयआयटी मुंबईला तब्बल १६० कोटी रुपयांची देणगी.!

78

मुंबई : मुंबईतील आयआयटी या संस्थेला एका अज्ञात व्यक्तीकडून तब्बल १६० कोटी रूपयांची देणगी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. साम टीव्ही या वृत्तवाहिनीने ही माहिती दिली असून या देणगीमुळे आयआयटी मुंबई सध्या चांगलीच चर्चेत आहे.

दरम्यान, इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन नीलेकणी यांनी काही दिवसांपूर्वी IIT मुंबईला ३१५ कोटी रुपये दान केले होते. या संस्थेत त्यांनी शिक्षणासाठी प्रवेश घेतल्याच्या घटनेला ५० वर्षे पूर्ण झाल्यामुळे त्यांनी ही रक्कम दान केली होती. नंदन नीलेकणी स्वत: याबाबत सोशल मीडियावर माहिती दिली होती. पण यावेळी आयआयटी मुंबईला एका अज्ञात व्यक्तीने  तब्बल १६० कोटींची देणगी दिली आहे. आयआयटी मुंबईचे संचालक प्रोफेसर सुभासिस चौधरी यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. अज्ञात देणगीदार संस्थेचा माजी विद्यार्थी असल्याचे त्यांनी सांगितले आहे.