उत्तम फोंडेकर यांचे तहसीलदारांनी केले अभिनंदन…!

131

मालवण : मालवणच्या तहसीलदार वर्षा झाल्टे यांनी आदर्श  युवा शेतकरी उत्तम फोंडेकर यांना नुकताच दिल्लीत बाबू जगजीवन राम हा पुरस्कार मिळाल्याबद्द्ल त्यांच्या घरी सदिच्छा भेट देऊन फोंडेकर यांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या. हा पुरस्कार देशातील कुठल्याही क्षेत्रातील अतुलनीय कार्य केलेल्या प्रभावशाली व्यक्तीना देण्यात येतो. यावरून फोंडेकर यांचे हापूस क्षेत्रातील चिकाटी, परिश्रम, त्यासाठी वापरलेले उच्च तंत्रज्ञान आणी आदर्श शेती पद्धती याचा प्रत्यय दिसून येतो. तसेच यावेळी तहसीलदार श्रीमती झाल्टे यांनी फोंडेकर यांच्या बागेत कलमांना आलेल्या मोहोराची पाहणी केली आणी त्यासंदर्भात माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांच्यासोबत सिंधुदुर्ग कॉलेजचे प्राध्यापक लेफ्टनंट डॉ. एम. आर. खोत उपस्थित होते.