प्रलंबित सबसिडीची रक्कम तात्काळ द्या! ; आमदार वैभव नाईक यांची मागणी।

40

मुंबई : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांची आमदार वैभव नाईक यांनी मुंबई येथील खादी भवन येथे भेट घेतली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांनी खादी ग्रामोद्योग अंतर्गत विविध बँकांकडून घेतलेल्या कर्ज प्रकरणांतील प्रलंबित सबसिडीची रक्कम लाभार्थ्यांना अद्यापही मिळाली नाही. त्यामुळे नागरिकांना नवीन कर्ज प्रकरणे करता येत नाहीत, त्याचबरोबर बँक देखील एनओसी देत नाहीत. याकडे वैभव नाईक यांनी रवींद्र साठे यांचे लक्ष वेधत प्रलंबित सबसिडीची रक्कम लवकर देण्यात यावी, अशी विनंती केली आहे.