कणकवली : कलमठ येथील दळवी कॉलनी येथे गुरुवारी रात्रीच्या वेळी सहा फूट अजगर रस्त्यावर आल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली. भक्षाच्या शोधत रात्रीच्या अंधारात गवतात पळण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या या महाकाय अजगराला सर्पमित्रांच्या सहकार्याने पकडून जंगल भागातील नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.





