रेल्वे अपघातात सातोसे येथील एकाचे निधन…!

367

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील सातोसे देऊळवाडी येथील रामचंद्र राघोबा नाईक (वय ६५ ) यांचे रेल्वे अपघातात निधन झाले आहे.रेल्वे रुळावरून गोव्याहून सातोसे येथे चालत येत असताना रेल्वेची धडक बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला.मृतदेह शवविच्छेदनासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला आहे.या घटनेची माहिती सातोसे माजी सरपंच बबन सातोसकर यांनी दिली आहे.